पालिकेच्या लाखखोर अभियंत्यास अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 August 2018

पालिकेच्या लाखखोर अभियंत्यास अटक

मुंबई - मुंबई महापालिकेच्या अंधेरी पश्चिम येथील के / पश्चिम कार्यालयात लाच घेताना कनिष्ठ अभियंता किरण पाटीलला शनिवारी अटक करण्यात आली आहे. अंधेरी येथील एका अनिकधृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी इमारत विभागात कार्यरत असलेल्या पाटीलने लाच मागितली होती. तक्रारदाराने या प्रकरणी लाचलपुचपत विभागाकडे धाव धेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानूसार शनिवारी पाटीलला कार्यालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कार्यालयातील अमोल जाधव व आनंद नेरूरकर या दोघा अभियंत्यांनी काही दिवसांपूर्वीच लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्याच्या अटकेमुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Post Bottom Ad