राज्याला देण्यात आलेला दुष्काळ निधी अत्यल्प - आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्याला देण्यात आलेला दुष्काळ निधी अत्यल्प - आठवले

Share This

सोलापूर - यंदाच्या वर्षी कधी नव्हे एवढी भीषण दुष्काळजन्य परिस्थिती राज्यात निर्माण झाली असून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांना घोषित करण्यात आलेला दोन हजार कोटींचा निधी अत्यल्प असून त्यात वाढ करून द्यावी, अशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली..

राज्यात दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्याकरिता आठवले हे तीन दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर असून, रविवारी त्यांनी लातूर उस्मानाबाद येथील पाहणी करत सोलापुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तर वर्षांपूर्वी देशाला नद्याजोड प्रकल्प दिला होता; परंतु तत्कालिन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही अवस्था हे भोग आता महाराष्ट्र राज्य भोगत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात नद्या जोड प्रकल्प होणे आवश्यक आहे, त्यादृष्टीने देशाचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अभ्यास सुरू केला असल्याचे ना. आठवले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. भीषण दुष्काळजन्य परिस्थिती असलेली गावे ही दुष्काळग्रस्त गावे म्हणून घोषित व्हावीत, असा आपला आग्रह आहे आणि त्यादृष्टीने आपण मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहोत. दुष्काळासंदर्भात ज्या अटी आहेत त्या शिथिल कराव्यात, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार आहोत. गावागावात विहीर, बोअर अधिग्रहण कार्यक्रम शासनाने हाती घेतले आहेत. त्यादृष्टीने दुष्काळाची दाहकता कमी करण्याचे शासनस्तरावर प्रयत्न असल्याचे आठवले यांनी सांगितले.

विधानसभेच्या ९ जागांचा आग्रह - आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने उमेदवार उभे करणार असून, महायुतीच्या माध्यमातून हे सर्व उमेदवार निवडून येतील, असा आशावाद ना. आठवले यांनी व्यक्त केला. परंतु त्यावेळी त्यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा फायदा पुन्हा एकदा विधानसभेत महायुतीला मिळेल. तिसऱ्या आघाडीला जनता स्वीकारत नाही हे अनेकवेळा सिद्ध झाले असल्यामुळे ॲड. प्रकाश आंबेडकर विधानसभेत फेल ठरतील, असे ना. आठवले यांनी सांगितले..

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages