वाईप्समुळे लहान बाळांना होऊ शकते ऍलर्जी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

वाईप्समुळे लहान बाळांना होऊ शकते ऍलर्जी

Share This


मुंबई - लहान बाळाला पुसायचं असल्यास अनेकजण वाईप्सचा म्हणजे ओल्या टिश्यूंचा वापरतात. काही घरांमध्ये बाळाला अंघोळ घालण्याच्या बदल्यात फक्त अशा वाईप्सनी पुसलं जातं. प्रवासातही लहान मुलांसाठी वाईप्सचा वापर करण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र हे वाईप्स वापरल्याने लहान बाळाला त्वचेची ऍलर्जी होऊ शकते असे एका अभ्यासातून समोर आले आहे. 

अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासानुसार, ओल्या टिश्यूंमुळे लहान बाळांना ऍलर्जी होऊ शकते. ज्यामुळे लहान मुलांच्या त्वचेवर पुरळ उठू शकतात असे निदर्शनास आले आहे. यासाठी संशोधकांनी उंदरावर प्रयोग केला. यामध्ये संशोधकांनी या ओल्या टिश्यूंमध्ये वापरला जाणारा सोडियम लॉरिट सल्फेट हा घटक उंदराच्या त्वचेला लावला. दोन आठवड्यांनी संशोधकांना उंदराच्या त्वचेवर पूरळ आल्याचं आढळलं. संशोधकांच्या सांगण्यानुसार, त्वचेच्या संरक्षणासाठी एक तेलाचा थर असतो. वेट वाईप्समध्ये असणाऱ्या या घटकांमुळे त्वचेवरील हा तेलाचा थर निघून जातो. आणि त्यामुऴे बाळाला ऍलर्जी होऊ शकते.

“पालकांनी बाळांसाठी ऑईल असलेले ओले टिश्यू वापरले पाहिजेत. जर अल्कोहोल असलेले टिश्य़ू वापरले तर त्वचेवरील तेलाचा थर निघून जाऊन ऍलर्जी होऊ शकते. त्यामुळे अल्कोहोल असलेले टिश्यू बाळांसाठी वापरू नये. शिवाय बाळाचं अंग पुसल्यानंतर शरीराला मॉईश्चराईजर किंवा तेल लावावं. जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही.” असे डॉक्तरांनी सल्ला दिला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages