विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २४ जानेवारीला पोटनिवडणूक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २४ जानेवारीला पोटनिवडणूक

Share This

नवी दिल्ली, दि. 04 : धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी 24 जानेवारी 2020 ला पोटनिवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

मागीलवर्षी 24 ऑक्टोबरला विधानपरिषदेचे आमदार धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेल्याने वरिष्ठ सदनाची ही जागा रिक्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी विधानपरिषदेच्या या रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 7 जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी असून 15 जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 17 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 24 जानेवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल. या विधानपरिषद सदस्यपदाची कालमर्यादा 7 जुलै 2022 पर्यंत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages