भगवतीत ऑक्सिजनचा तुटवडा - २५ रुग्णांना शताब्दी रुग्णालयात हलवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 April 2021

भगवतीत ऑक्सिजनचा तुटवडा - २५ रुग्णांना शताब्दी रुग्णालयात हलवलेमुंबई - बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने येथील २५ कोविड रुग्णांना दहिसर येथील शताब्दी व जम्बो कोविड रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या रुग्णांना आयत्यावेळी ऑक्सिजनची गरज भासल्यास अडचण येऊ नये यासाठी खबरदारी म्हणून त्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने बेड्चा तुटवडा भासतो आहे. सध्या रोज दहा हजारावर रुग्ण सापडत असल्याने रुग्णसेवेवर ताण येतो आहे. आवश्यकवेळी बेड्स मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये काही गंभीर रुग्ण असल्याने त्यांना ऑक्सिजन, वेंटिलेटरची आवश्यकता लागते आहे. रोजची रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही सेवा अपुरी पडते आहे. बोरीवलीच्या भगवती रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासत असल्याने येथील २५ कोरोना रुग्णांना कांदिवलीच्या शताब्दी व जंबो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. या रुग्णांची आयत्यावेळी ऑक्सिजन शिवाय गैरसोय होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याच्या शक्यतेने पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरु केला आहे. याकडे लक्ष वेधून बेड्स, ऑक्सिजन उपलब्ध करण्याच्या दृष्टीने पालिकेने प्रयत्न सुरु केला आहे. खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्स पालिकेने ताब्यात घेतले आहेत. येत्या काही दिवसांत पुरेसा बेड्स उपलब्ध होतील असा दावा प्रशासनाने केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad