मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटते आहे. मागील २४ तासात ८३१ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल ५८६८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख ७० हजार ८२ वर गेली आहे. तर आतापर्यंत ६ लाख ७२ हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १४९०७ वर पोहचला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत १७ हजार ३२८ सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मुंबईत झपाट्याने वाढलेली रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून घटते आहे. रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सोमवारी ६७६ रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी यात काहीशी वाढ होत रुग्णांची आकडेवारी ८३१ झाली आहे. मागील २४ तासांत २३५०३ चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९५ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढून ४५३ दिवसांवर पोहोचला आहे.
No comments:
Post a Comment