Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

लसीच्या ९ पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी सुरु



मुंबई - लसीच्या पुरवठ्यासाठीच्या ९ संभाव्य पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी येत्या २ ते ३ दिवसात केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. या ९ संभाव्य पुरवठादारांपैकी ७ पुरवठादारांनी स्पुटनिक फाईव्ह या कोविड लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे तर त्यातीलच एका पुरवठादाराने स्पुटनिक लाईट या कोविड लसीचा देखील पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे. तर अन्य एका पुरवठादाराने मान्यता प्राप्त लसींपैकी जी प्राप्त होईल त्या लसीचा पुरवठा करण्यास स्वारस्य दाखविले आहे.

महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या निर्देशानुसार, उप आयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) रमाकांत बिरादार तसेच उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे व सहकारी अधिकारी कोविड लस पुरवठा उपलब्ध करुन घेण्याबाबतची ही कार्यवाही पार पाडत आहेत. लस पुरवठ्याबाबतच्या या जागतिक निविदांसाठी गेल्या १८ मे आणि २५ मे रोजी मुदतवाढ दिली होती. आता अंतिम मुदतीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी करण्यात येत आहे.

लस पुरवठा करण्यास इच्छूक असलेले पुरवठादार व प्रत्यक्ष लस उत्पादीत करीत असलेल्या कंपन्या या दोघीणमधील असलेले व्यावसायिक संबंध पडताळून पाहणे अवश्यक आहे. जेणेकरुन लस पुरवठा हा दिलेल्या मुदतीत आणि सुरळीतपणे होईल, याची खात्री पटेल व किती दिवसात लस साठा पुरवला जाईल, किती संख्येने लस साठा पुरवला जाईल, लसीचे दर व रक्कम अधिदान करण्याच्या अटी व शर्ती या मुख्य पैलूंचा अतिशय बारकाईने अभ्यास करुन महानगरपालिका प्रशासन कोविड प्रतिबंधक लस साठा उपलब्ध करण्याविषयी सतत पाठपुरावा करीत आहे. सर्व कागदपत्रांची छाननी करुन याबाबतची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom