Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईत २४ तासांत ३६२ रुग्णांची नोंद - ५३९ रुग्णांची कोरोनावर मातमुंबई - मुंबईत मागील काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत घट झाली असून पाचशेच्या आत नोंद होते आहे. रविवारी ३६२ नवीन रुग्ण आढळले. तर १० रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ५३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी ४१३ रुग्ण आढळले होते. घटणारी रुग्णसंख्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. 

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. रुग्णांची नोंद चारशे ते साडे चारशेच्या दरम्यान नोंद होते आहे. रविवारी ३६२ रुग्ण आढळले. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ७ लाख ३४ हजार ११९ वर गेली आहे. तर ७ लाख १० हजार ३४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृतांचा आकडा १५७७६ वर पोहचला आहे. सद्यस्थितीत ५६१० सक्रीय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मागील २४ तासांत ३१६०१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ९७ टक्के झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२९९ दिवसांवर पोहचला असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom