Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

एसटी कामगारांच्या घोषणांनी आझाद मैदान दुमदुमलेमुंबई - एसटी महामंडळाला (St Transport) शासनात (Govt Of Mahrashtra) विलीनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी एसटी कामगारांनी पुकारलेल्या बेमुदत संपावर (St Strike) अद्याप तोडगा निघाला नसल्याने राज्यभरातील कामगार आक्रमक झाले आहेत. मागील १२ दिवसांपासून एसटी कामगार या मागणीसाठी आझाद मैदानात (Azad Maidan) ठाण मांडून बसले आहेत. सरकारच्या चालढकलपणाच्या निषेधार्थ शनिवारी शेकडो कामगारांनी विविध घोषणांनी आझाद मैदानाचा परिसर दणाणून सोडला.

संतप्त कामगार परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्यावर मोर्चा काढण्यासाठी आझाद मैदानातून जाण्यासाठी निघाले. मात्र पोलिसांनी बॅरेकेट्स लावून आझाद मैदानातच मोर्चा अडवला. शेकडोंच्य़ा संख्येने एसटी कामगार एकवटल्याने या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढणारच असा इशारा एसटी कामगारांनी दिला आहे. यावेळी भाजपचे नेते आमदार गोपिचंद पडळकर, सदाभाऊ खोत, किरीट सोमय्या उपस्थित होते.

एसटी महामंडळाला शासनात विलिन करा या मागणीसाठी मागील १५ दिवसांपासून एसटी कामगारानी आझाद मैदानात ठिय्या मांडला आहे. मागणीबाबत सरकारसोबत झालेल्या चर्चेवर अद्याप तोडगा निघालेला नाही. परिवहन मंत्री अनिल परबही यावर सकारात्मक निर्णय घेत नसल्याने एसटी कामगार आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानात आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्य भरातील कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी राज्यभरातील कामगार मुंबईच्या आझाद मैदानात पोहचून आंदोलनात सहभाग घेतला.

दुपारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या बंगल्य़ावर मोर्चा काढण्याचा निर्णय कामगारांनी घेतला. जोरदार घोषणा सुरु करून मोर्चासाठी कूच करण्याचा प्रयत्न कामगारांनी केला. मात्र पोलिसांनी मोर्चेकरांना आझाद मैदानातच रोखून ठेवले. अनिल परब यांना खणा नारळाची ओटी भरण्याचे कामगारांनी जाहिर केले. मात्र पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांचा बंदोबस्त व बॅरेकेट्स लावल्याने कामगारांना आझाद मैदानाबाहेर बाहेर पडता आले नाही. त्यांना पोलिसांनी आझाद मैदानाच रोखून ठेवण्यात आले. त्यामुळे संतप्त कामगारांनी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून आझाद मैदान दणाणून सोडले.

सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल -
आझाद मैदानात एसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपचे गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत सहभागी झाले आहेत. एसटी कामगारांच्या मागणीवर सरकार चालढकलपणा करीत असल्याचा आरोप करी सदाभाऊ खोत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. असा सैतान परिवहन मंत्री मी पाहिला नव्हता अशी टीका अनिल परब यांच्यावर केली. त्यांना साडी चोळी भेट द्या असे आवाहनही त्यांनी एसटी कामगारांना केली. मात्र मोर्चा अडवण्यात आल्याने पोलिसांमार्फत परिवहन मंत्र्यांना ही भेट पाठवण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom