डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे - संभाजी भिडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे - संभाजी भिडे

Share This


अमरावती - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनाची भीती डॉक्टरांनी पसरवल्याच्या आशयाचे वक्तव्य करताना डॉक्टरांवरच निशाणा साधलाय. डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका,’ असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केले आहे. (Doctors spread fear of Corona, The doctor deserves to be beaten - Sambhaji Bhide)

अमरावतीमध्ये एका कार्यक्रमाममध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी अपशब्दही वापरले आहेत.भाषणादरम्यान मास्क घालून बसलेल्या एका व्यक्तीला पाहून भिडेंनी, ‘तोंडावरचे काढ ते.. नाहीयस तू,’’ असे म्हटले आहे. त्यानंतर उपस्थित व्यक्ती हसू लागले.

पुढे बोलताना संभाजी भिडेंनी, ‘‘करोना मुस्की (मास्क) बांधणे …पणाचे लक्षण आहे, डॉक्टरांना काय सांगायचे ते सांगू देत. डॉक्टर नालायक आहेत,’’ असेही म्हटले. ‘डॉक्टर लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत. डॉक्टर आपटून मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका,’ असेही संभाजी भिडेंनी कोरोनासंदर्भातील वक्तव्य करताना म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages