मुंबई - पारंपरिक गुढीपाडवा सणाचा सळाळता उत्साह आज मुंबईत दिसला. शाेभायात्रांनी रस्ते फुलून गेले हाेते. अगदी गिरगाव पासून दहिसर, मुलुंड पर्यंत ठिक - ठिकाणी जल्लाेषात शाेभायात्रा निघाल्या. ढाेल, ताशे, चाैघडे, डिजेच्या तालावर तरूणाई थिरकली. शाैभायात्रांमध्ये फेटे परिधान करून नटल्या सजलेल्या बुलेटस्वार महिलांचा सहभागही लक्षणिय हाेता. काेराेनाचे निर्बंध हटविल्यानंतर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नववर्षांचे जल्लाेषात स्वागत झाले. दाेनवर्षे काेराेनाच्या संकटाने व्यापलेली गुढीपाडव्याच्या जल्लाेषात मुंबई उजळून निघाली.
मागील दाेन वर्षे काेराेनाच्या संकटाचा काळ हाेता. निर्बंध शिथील केल्यामुळे आज पहिल्यांदाच मुंबई जल्लोषात गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. सकाळीच घरावर गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात गुढी पाडवा साजरा झाला. हिंदू नववर्षाचे मुंबईकरांनी जाेरदार स्वागत केले. शाेभायात्रांचे अनेक रस्ते रांगोळ्यांनी सजले आहेत. स्त्रीपुरुष नटून थाटून, पारंपरिक वेशभूषेत शोभायात्रेत सहभागी झाले आहेत. मंत्रीमंडळाने कोरोनाचे सर्व निर्बंध उठविल्याने गुढी पाडव्याचा आनंद द्विगुणित झाला आहे. मुंबईतील रस्ते मिरवणुकांनी फुलून गेले आहेत. मुंबईत गुढीपाडव्याचा जल्लोष सुरू हाेता.
गिरगाव, दादर, लालबाग, परळ, पार्ले, घाटकाेपर, मुलुंड तसेच विभागवार शाेभायात्रा काढण्यात आल्या हाेत्या. ढोल ताश्यांमुळे शहर आणि उपनगर दणाणून गेला. शाेभायात्रेत तरूणांचा आणि महिलांचा माेठा सहभाग हाेता. भगवे फुटे घालून ते सहभागी झाले हाेते. यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते. मास्क एेच्छिक असल्याने शाेभायात्रांमध्ये मास्क शिवाय नागरिक सहभागी झाले हाेते. तर अनेकजण मास्क लावून कोरोना निर्बंधाचे पालन करतानाही दिसत होते. राजकीय नेत्यांनीही आपापल्या निवासस्थानी गुढी उभारली.
प्रबाेधनाची गुढी -
गिरगावातील दत्त मंदिरात विधिवत पूजा केल्यानंतर गिरगाव सिग्नलवर अर्धा तास ढाेल पथकाचे सादरीकरण झाले. पारंपरिक वेशातील २०० महिला बाईकस्वार सहभागी झाल्या हाेत्या. या शोभा यात्रेत १८ चित्ररथ सहभागी होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे चित्ररथ, लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा देणारे चित्र रथ, सरकारी झालेल्या कामाचे चित्ररथ, कोरोना काळातील उपाययोजनांवरील चित्र रथ , सांस्कृतिक चित्ररथ, महापालिका निवडणुकांवर आधारित चित्र रथ, डबेवाला भवन चित्र रथ आणि डबेवाल्यांची दिंडी निघणार आहेत. वाटेत जागो जागी मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या काढल्या जातील. अनेक ठिकाणी प्रबाेधनाचे कार्यक्रम सादर करून प्रतिकात्मक गुढी उभारली.
No comments:
Post a Comment