महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा विजयी डबल धमाका, यजमान गुजरातला चारली धुळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2022

महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा विजयी डबल धमाका, यजमान गुजरातला चारली धुळ



अहमदाबाद - सुपरस्टार रेडर पुजा यादव आणि मेघा कदमने सुरेख खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाचा ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये विजयाचा डबल धमाका उडवला. महाराष्ट्र महिला संघाने मंगळवारी दुसऱ्या सामन्यात यजमान गुजरातला धुळ चारली. स्नेहलच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र संघाने ४६-२२ ने दणदणीत सामना जिंकला. महाराष्ट्र संघाने सर्वाेत्तम खेळीतून गुजरातवर चार लाेन मारले. यासह टीमने शेवटच्या मिनिटांपर्यंत सामन्यात आपले वर्चस्व राखून ठेवले. यासह महाराष्ट्र संघाला सलग दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद करता आली. महाराष्ट्राच्या नवदुर्गांनी नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला विजय साजरा केला. प्रशिक्षक संजय माेकळ यांच्या अचुक डावपेचातून महाराष्ट्राने एकतर्फी विजय साकारला. आता महाराष्ट्र संघाला आज बुधवारी विजयी हॅटट्रिकची संधी आहे. महाराष्ट्राचा गटातील तिसरा सामना बिहारशी हाेणार आहे.

पुजा, मेघाची सर्वाेत्तम खेळी - 
महाराष्ट्र संघाने मंगळवारी गटातील दुसऱ्या सामन्यासाठी संघात एक बदल केला. बाेनसची स्टार साेनाली शिंगटेला विश्रांती देण्यात आली. तिच्या जागी पुजा यादवला संधी देण्यात आली. याच विश्वासाला सार्थकी लावताना पुजा यादवने सुरेख चढाई करून संघाच्या विजयात माेलाचे याेगदान दिले. आपल्या शैलीदार चढाईतून तिने यजमान गुजरातविरुद्ध सर्वाधिक गुणांची कमाई केली. त्याचबराेबर अशाच प्रकारची ताेडीसताेड खेळी मेघा कदमने केली. त्यामुे संघाच्या माेठ्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला. यातून चार लाेनने गुजरातला धुळ चाखावी लागली.

अंकिता,सायलीची अचुक पकड -
महाराष्ट्र संघातील गुणवंत खेळाडू अंकिता जगताप आणि सायली जाधवची खेळी लक्षवेध ठरली. त्यांनी आपल्या अचुक पकडीतून गुजरात टीमच्या रेडरचा गडी मारण्याचा प्रयत्न वेळाेवेळी हाणुन पाडला. त्यामुळे गुजरात टीमला घरच्या मैदानावर लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. पकडीतून अंकिता आणि सायलीने सामना गाजवला.

आज बिहारविरुद्ध विजयाची संधी - 
महाराष्ट्र महिला संघाला आता गटात विजयी हॅटट्रिकची संधी आहे. यासाठी महाराष्ट्र संघ बुधवारी गटातील तिसऱ्या सामन्यासाठी मैदानावर उतरणार आहे. महाराष्ट्र आणि बिहार यांच्यात सामना रंगणार आहे. यजमान गुजरातला पराभूत करून बिहारने सलामी दिली हाेती.

किताबाचा दावा मजबुत -
महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने सलग दुसरा विजय साकारून स्पर्धेतील आपला किताबाचा दावा मजबूत केला आहे. टीमची दुसऱ्या सामन्यातील कामगिरी काैतुकास्पद ठरली. पुजा,मेघा, सायली, अंकिता यांनी लक्षवेधी खेळी केली. त्यामुळे विजय मिळवता आला.
नामदेव शिरगावकर, सचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad