मुंबई - एका तरुणाने एका अल्पवयीन मुलीला ‘आयटम’ (Iteam) म्हणून संबोधले होते. पोक्सो कोर्टाने (Posco Court) या तरुणाला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे, जेव्हा एखाद्या मुलीला उद्देशून ‘आयटम’ म्हटले जाईल त्याला लैंगिक शोषण समजले जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे.
२०१५ मध्ये हे प्रकरण घडले होते. एका २६ वर्षीय व्यावसायिकाने १६ वर्षीय मुलाचा छळ केला. पीडिता शाळेतून घरी परतत असतांना त्याने तिचे केस ओढले आणि ‘क्या आयटम कहाँ जा रही हैं?’ असं म्हटलं. ही बाब न्यायालयाने गंभीर मानत लैंगिक हेतूने पाठलाग केल्याचे नमूद केले आहे. १४ जुलै २०१५ रोजी जेव्हा पीडितेसोबत हा प्रसंग घडला तेव्हा तिने तातडीने १०० क्रमांकावर फोन फिरवला. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत आरोपींनी तिला धक्काबुक्की करत तिथून पळ काढला. याप्रकरणाच्या सुनावणीवेळी न्यायाधीश अन्सारी म्हणाले की, अशा रोडरोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे. पोक्सो कोर्टाने या आरोपीला दोषी ठरवल्यानंतर त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे माफीची याचिका करण्यात आली होती. परंतु कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली.
No comments:
Post a Comment