Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

भाजप वरळीत दांडियानंतर आता दिवाळी साजरी करणारमुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्याा(Bmc Elections) पार्श्वभूमीवर भाजपने (Bjp) उत्सवाच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दहीहंडी, नवरात्रौत्सवानंतर आता दिवाळीनिमित्त विविध कार्यक्रम आजोजित करून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न भाजपचा असणार आहे. मुंबई भाजपच्या वतीने युवासेना नेते आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी येथील जांबोरी मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी दांडियानंतर भाजप आता १९ ते २३ ऑक्टोबर दरम्यान वरळी येथे विविध मराठी कलाकारांना निमंत्रित करून सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून दिवाळी साजरा करणार असल्याचे सांगण्यात आले.

कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष सणांवर निर्बंध होते. मात्र आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व सण धुमधडाक्यात साजरे केले जात आहेत. सध्या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने सर्व सण धडाक्यात साजरे करण्यास परवानगी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा सण, उत्सवाच्या माध्यमातून राजकीय पक्षांकडून विविध भाषिक मतदारांना आकर्षित केले जाते आहे. यात भाजप आघाडीवर असल्याचे दिसते आहे. यात शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या मराठी मतदारसंघात अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघासह परळ, शिवडी, लालबाग आदी मराठी मतदारांना आकर्षित केले जात आहे. दहिहंडी, नवरात्रौत्सव (दांडिया) कार्यक्रम भाजपने आयोजित केले होते. काळाचौकी येथे भाजपने दांडिया आयोजित करून मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विविध सेलिब्रेटींनाही निमंत्रित करण्यात आले होते. भाजपने निवडणुकीआधी सणांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क करण्यावर भर दिला आहे. यात वरळी मतदारसंघाला लक्ष्य केले आहे. काळाचौकी या सर्वाधिक मराठी भाषिक विशेषतः शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दांडिया साजरा केल्यानंतर भाजपने आता वरळी परिसरात दिवाळी सणानिमित्त कार्यक्रम घेण्याचे ठरवले आहे. हा परिसर शिवसेनेचे प्राबल्य असलेला भाग ओळखळा जातो. या मतदारसंघात माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते आदित्य ठाकरे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आले होते. महाविकास आघाडीत ते पर्यावरण मंत्री होते. या मतदारसंघात भाजपने विशेष लक्ष्य केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकीत वरळी मतदारासंघात भाजपचा उमेदवारच निवडुन आणण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तिथल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपकडुन दिवाळी उत्सव कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात मराठी लोकसंख्या असल्याने आम्ही मराठी कलाकारांना सादरीकरणासाठी आमंत्रित करणारे अनेक कार्यक्रम ठेवण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom