अंधेरी पोट निवडणुकीत ऋतुजा लटके विजयी, भाजपाच्या नोटाला मतदारांचा धक्का - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 November 2022

अंधेरी पोट निवडणुकीत ऋतुजा लटके विजयी, भाजपाच्या नोटाला मतदारांचा धक्का


मुंबई - अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने पोट निवडणूक झाली. या पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पोट निवडणुकीत एकूण ३१.७५ टक्के इतके म्हणजेच ८६१९८ मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ६६२४७ मते मिळाली आहेत. या निवडणुकीत नोटाला १२७७६ मते मिळाली आहेत. 

अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीतून भाजपाने माघार घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला होता. आपला उमेदवार मागे घेतला तरी भाजपकडून नोटाला मतदान करण्यासाठी प्रचार करण्यात आला होता. नोटाला मतदान केल्याने  काकाला म्हणजेच भाजपाकडून उमेदवारी मागे घेतलेले मुरजी पटेल यांना मत जाईल असे आवाहन करणारे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यानंतरही मतदारांनी भाजपाचे आवाहन धुडकावून लावल्याचे दिसून आले आहे. 

अंतिम निकाल
१) ऋतुजा लटके - ६६२४७
२) बाला नाडार - १५०६
३) मनोज नायक - ८८८
४) नीना खेडेकर - १५११
५) फरहाना सय्यद - १०८७
६) मिलिंद कांबळे - ६१४
७) राजेश त्रिपाठी - १५६९
८) नोटा - १२७७६
एकूण मते - ८६१९८

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad