मुंबई - दादर येथे भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे निवासस्थान, त्यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी (Chaitybhumi) आहे. यामुळे दादर रेल्वे स्थानकाला (Dadar Railway Station) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी गेले कित्तेक वर्षे केली जात आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आज भीम आर्मी (Bheem Army) संघटनेच्यावतीने दादर रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन केले जाणार आहे. (Bheem Army protest today for renaming of Dadar railway station)
दादर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान, त्यांचे स्मारक असलेली चैत्यभूमी आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्यदिव्य असे स्मारक इंदू मिलमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्थानकाला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी गेले कित्तेक वर्षे केली जात आहे. मात्र या मागणीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी भीम आर्मी आणि इतर संघटना वेळोवेळी आंदोलन करत आले आहेत. नुकतीच भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांची भेट घेवून ६ डिसेंबरपूर्वी दादर स्टेशनचे नामांतर करावे तसेच ६ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने आज दादर रेल्वे स्टेशन येथील स्वामी नारायण मंदिराजवळ सकाळी ११ वाजता भीम आर्मी कडून निदर्शने आंदोलन केली जाणार आहेत अशी माहिती राष्ट्रीय सरचिटणीस अशोक कांबळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment