Health News - डास चावू नये म्हणून "हे" उपाय करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2023

Health News - डास चावू नये म्हणून "हे" उपाय करा


मुंबई - रात्रीच्यावेळी डास चावले तर झोप मोड होते. याशिवाय अंगावर पुरळ आल्यानंतर खाज येते. त्याचबरोबर डासांमुळे घातक आजार होऊ शकतात. डास चावू नयेत यासाठी डासांचा स्प्रे, जेल वापरलं जातं. पण त्याचा परीणाम तात्पुरता दिसून येतो. डास पळवणाऱ्या लिक्वीड रिफिलचा कधी कधी उपयोग होत नाही. डासांना पळवून लावण्यासाठी काही सोपे फायदेशीर ठरू शकतात.जास्त पैसै खर्च  न करता डासांच्या त्रासापासून सुटका मिळेल.

लिंबू आणि लवंग -
लवंग आणि लिंबू  डास पळवण्याचा उत्तम उपाय आहेत. लिंबू कापून त्यात लवंग भरा. आणि घराच्या अशा कोपऱ्यावर ठेवा जिथे सगळ्यात जास्त डास येतात.  यामुळे डास घराबाहेर राहतील.

कापूर - 
जर रात्री डास खूपच त्रास देत असतील आणि तुम्हाला इतर केमिकल्सयुस्त उत्पादनांचा वापर करायचा नसेल तर तुम्ही कापराचा वापर करू शकता . १५ ते २० मिनिटांसाठी कापूर जळण्यासाठी ठेवा. या उपायानं डास दूर पळतील.

कडुलिंबाचे तेल - 
कडुलिंबाच्या तेलाचा वापर डासांना पळवण्यासाठी केला जातो. कडुलिंब आणि नारळाचं तेल समान प्रमाणात घेऊन मिसळा. हे तेल शरीराला व्यवस्थित लावा जवळपास ८ तास डास डास आजूबाजूला येणार नाहीत.

निलगिरीचं तेल -
दिवसभर तुम्हाला डास चावत असतील तर निलगिरीच तेल वापरू शकता. हा उपाय करण्यासाठी निलगिरीच्या तेलात योग्य प्रमाणात  लिंबू मिसळा. हे तेल शरीलाला लावा यामुळे डास आसपास येणार नाहीत.

लसूण - 
घरात डास येऊ नयेत यासाठी लसूण वापरा. लसणाच्या वासाने डास पळून जातात. यासाठी लसूण बारीक करून पाण्यात उकळवा. आता हे पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर शिंपडा. त्यामुळे बाहेरून डास घरात येणार नाहीत.

लव्हेंडर - 
डासांना दूर करण्यासाठी आणखी एक घरगुती उपाय म्हणजे लव्हेंडर त्याचा सुगंध खूप तीव्र असतो, त्यामुळे डास आजूबाजूला येत नाहीत आणि तुम्हाला चावणार नाहीत. तुम्ही घरात लव्हेंडर रूम फ्रेशनरही लावू शकता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad