मुंबई - जून महिना संपला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. उन्हाळ्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पाऊस कधी पडेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातच आज सकाळी ९ च्या सुमारास मुंबईत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Mumbai Rain News)
वातावरणात मोठे बदल झाल्याने नागरिकांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. जूनच्या सुरुवातीला पडणारा पाऊस जून संपायला आला तरी पडलेला नाही. तापमान वाढत असल्याने नागरिक घामाघूम होत आहे. कधी पाऊस पडेल असा प्रश्न मुंबईकर विचारत होते. मुंबईत २४ जून पासून मान्सून सक्रिय होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली होती. मात्र त्याआधी एक दिवस (२३ जून) मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. काही दिवसापूर्वी बिपरजॉय नावाचे चक्रीवादळ आले होते. या वादळामुळे यंदा पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. दरम्यान मुंबई प्रमाणेच ठाण्यातही पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत.
No comments:
Post a Comment