नांदेड युवक हत्या प्रकरणात शिवसेनेचा जिल्हा प्रमुख मास्टर माइंड, भीम आर्मीची कारवाईची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2023

नांदेड युवक हत्या प्रकरणात शिवसेनेचा जिल्हा प्रमुख मास्टर माइंड, भीम आर्मीची कारवाईची मागणी


मुंबई - नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख आनंद बोंडारकर यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी या संघटनेने केला आहे. ईतर आरोपीसोबत बोंडारकर यांना देखील या प्रकरणात आरोपी करण्यात यावे  अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देवून करण्यात आली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावात १ जून रोजी अक्षय भालेराव या बौद्ध युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आली. या हल्ल्यात भालेराव याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ आकाश हा गंभीर जखमी झाला. सदर प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ९ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ आरोपी अटकेत आहेत. सदर ९ आरोपीसोबतच शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बोंडारकर हे या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याने त्यांना देखील  आरोपी करावे अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. 

त्याचसोबत भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने नुकसान भरपाई म्हणून अर्थिक मदत देण्यात यावी, अक्षयचा भाऊ जखमी आकाश याला शासकीय नोकरी देण्यात यावी, भालेराव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी, भालेराव यांच्या कुटुंबास तात्काळ कायमस्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे, प्रत्येक ग्रामीण भागातील बौद्ध वस्तीत पोलीस चौकीची स्थापना करण्यात यावी, सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी, कार्यकर्त्याचा समावेश असलेल्या अनुसूचित जाती जमाती आयोगामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशा मागण्या भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केल्या आहेत. 

दरम्यान भीम आर्मीच्या या पत्राची दखल घेत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने भालेराव याच्या कुटुंबियांना चार लाख बारा हजार ५०० रुपये आर्थिक सहाय्यक देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad