संजय, सुनील राऊत यांचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2023

संजय, सुनील राऊत यांचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत यांचा शिवसेनेत प्रवेश


मुंबई - उबाठा गटाचे विक्रोळी कन्नमवार नगरचे माजी नगरसेवक, संजय आणि सुनील राऊत यांचे निकटवर्तीय उपेंद्र सावंत यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये (Shivsena) जाहीर प्रवेश केला. सकाळचा भोंगा ज्या विक्रोळीतून वाजतो त्याच विक्रोळीच्या माजी नगरसेवकाला पक्षात घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी राऊत बंधूंना 'जोर का झटका' दिला असल्याची चर्चा आहे. 

उपेंद्र सावंत यांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेमध्ये स्वागत केले. यावेळी बोलताना सावंत यांनी गेले दीड वर्षे आपल्या प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नाही. ज्यांनी आपल्याला निवडून दिले त्या  भागाचा विकास करता येणे शक्य होत नसेल तर कसे चालणार असे म्हणत आपल्या प्रभागातील विकासकामाना गती मिळावी यासाठी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना उपेंद्र सावंत यांनी शिवसेनेमध्ये आल्यामुळे शिवसेनेमध्ये दाखल झालेल्या नगरसेवकांची संख्या 33 झाली असून त्यातील 25 हे उबाठा गटाचे असल्याचे सांगितले. ज्या लोकांनी त्याना निवडून दिले त्याच लोकांची कामे करणे शक्य होत नसेल, विकासकामे होत नसतील तर नगरसेवक काय करणार..? त्यामुळेच अनेक नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. 

कधीही निवडणूक घ्या सामोरे जाण्याची आमची पूर्ण तयारी -
निवडणूक घेण्याची हिम्मत नसल्याचा आरोप आमच्यावर केला जातो, मात्र उबाठा गटाने वॉर्ड रचनेबाबत केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळेच निवडणूक घ्यायला विलंब लागत आहे असे सांगितले. उलट शिवसेनेची निवडणूक घेण्याची पूर्ण तयारी असून कधीही निवडणुका लागल्या तरीही त्याला सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. 

काम सुरू झाल्याचे कळल्यावर केईएम रुग्णालयावर मोर्चा -
उबाठा गटाने आज केईएम रुग्णालयावर मोर्चा काढला होता, मात्र काही दिवसांपूर्वी मी स्वतः केईएम रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. जिथे कमतरता जाणवल्या त्या त्वरित दूर करण्याचे निर्देश दिले. एवढच नव्हे तर बंद असलेल्या 6 वॉर्डचे काम तातडीने सुरू देखील करण्यात आले, काम सुरू झाल्यामुळे अस्वस्थ झाल्यामुळेच रुग्णालयावर मोर्चा काढला असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. 

एनडीएला हरवणं अशक्य, 2024 नंतर देखील मोदीच पंतप्रधान -
सध्या देशातील वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन मध्ये टिम्ब असलेली इंडिया आघाडी तयार केली आहे. काहीही करून नरेंद्र मोदी यांना हरवणे एवढाच या आघाडीचा मुख्य अजेंडा आहे. मात्र यापूर्वी देखील विरोधकानी एकत्र येऊन 2014 आणि 2019 साली आघाडी केली होती. मात्र तरीही त्याना नरेंद्र मोदी यांना हरवणे शक्य झाले नव्हते त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी पुन्हा एकदा बसलेले आपल्याला दिसतील असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages