मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे अंधेरी पूर्व (के/पूर्व) विभागामध्ये जलवाहिनी जोडण्याचे काम तसेच संरचना परीक्षणाचे (स्ट्रक्चरल ऑडिट) चे काम सकाळी ८ ते रात्री ११ दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी अंधेरी पूर्व (के पूर्व), अंधेरी पश्चिम (के पश्चिम), गोरेगांव (पी दक्षिण) विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा १५ तासांसाठी बंद राहणार आहे.
के पूर्व विभाग येथील महाकाली गुंफा मार्गावरील रम्य जीवन हाऊसिंग सोसायटी जवळ तसेच कार्डिनल ग्रेशियस मार्ग व बी. डी. सावंत मार्ग चौक, अंधेरी (पूर्व) येथे नवीन १ हजार ५०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी आणि तसेच १ हजार २०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी (वर्सोवा आऊटलेट) जोडण्याचे काम, वेरावली जलाशय १ व २ चे संरचना काम हाती घेण्यात आले आहे. दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुमारे १५ तास के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण विभागातील खालील नमूद परिसराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील संबंधित परिसरातील नागरिकांनी उपरोक्त नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणी पुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर -
१) के पूर्व विभाग - त्रिपाठी नगर, मुंशी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, दुर्गा नगर, मातोश्री क्लब, जोगेश्वरी (पूर्व), सारीपुत नगर, दुर्गा नगर,जोगेश्वरी (पूर्व), दत्त टेकडी, ओबेरॉय स्प्लेंडर, केल्टी पाडा, गणेश मंदीर (जे.व्ही.एल.आर.) जवळचा परिसर, बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानी पाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर, बांद्रा प्लॉट, हरी नगर, शिवाजी नगर,पास्कल वसाहत, शंकरवाडी, मेघवाडी, पंप हाउस, विजय राउत रस्ता , पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली टेकडी, आशीर्वाद चाळ, सर्वोदय नगर, कोकण नगर, विशाल हॉल, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकर वाडी, बिमा नगर, गुंदवली गावठाण पंथकी बाग, तेली गल्ली, कोलडोंगरी, जीवा महाले मार्ग , साईवाडी, जीवन विकास केंद्र मार्ग, अंधेरी (पूर्व) शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान मार्ग , श्रद्धानंद मार्ग , नेहरू मार्ग , तेजपाल मार्ग , शास्त्री नगर, राजेंद्र प्रसाद नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विले-पार्ले पूर्व , अमृतनगर, रामबाग, चकाला गावठाण, चकाला वजन काटा, भगत सिंग व चरत सिंग वसाहत, अंधेरी पूर्व, जुना नागरदास मार्ग , मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग रस्ता, निकोलस वाडी परिसर.
२) के पश्चिम विभाग - जोगेश्वरी स्थानक मार्ग, एस.व्ही. मार्ग, साब्री मशीद ते जेव्हीएलआर जंक्शन, मोरागाव, जुहू गावठाण, सांताक्रूझ (पूर्व), यादव नगर, कॅ. सावंत मार्ग, जोगेश्वरी स्थानक मार्ग, सहकार मार्ग, बांदिवली हिल.
३) पी दक्षिण - राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद) आणि बिंबीसारनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)
पाणी पुरवठा वेळेत बदल -
के पश्चिम विभागाच्या एस व्ही मार्ग, व्ही. पी मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्थानक मार्ग या परिसरात सध्या दररोज पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० या वेळेत पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.५० या वेळेत पाणी पुरवठा केला जाणार आहे. या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
३) पी दक्षिण - राम मंदिर, गोरेगाव पश्चिम (पाणीपुरवठा बंद) आणि बिंबीसारनगर (कमी दाबाने पाणीपुरवठा)
पाणी पुरवठा वेळेत बदल -
के पश्चिम विभागाच्या एस व्ही मार्ग, व्ही. पी मार्ग, जुहू गल्ली, उपासना गल्ली, स्थानक मार्ग या परिसरात सध्या दररोज पहाटे ३.३० ते सकाळी ८.३० या वेळेत पाणी पुरवठा केला जातो. मात्र जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरात दिनांक १ नोव्हेंबर २०२३ पासून सकाळी ७.३० ते दुपारी १२.५० या वेळेत पाणी पुरवठा केला जाणार आहे. या बदलाची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
No comments:
Post a Comment