Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Lok Sabha Election - प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंमध्ये लढतनवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने आज लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली आहे. भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून उमेदवारी जाहीर केली आहे.

सोलापुरात विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे तिकीट भाजपने कापले आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात राम सातपुते लढणार आहेत. राम सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर आज भाजपने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत राम सातपुते? - 
राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणून राजकारणात पुढे आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनास सुरुवात केली. त्यानंतर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून भाजपमध्ये प्रवेश केला.

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय - 
देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणा-या राम सातपुते यांना २०१९ च्या निवडणुकीत भाजपने माळशिरसमधून उमेदवारी दिली. विरोधात असलेल्या राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा अवघ्या २५९० मतांनी पराभव करून सातपुते विधानसभेत पाहोचले. विधिमंडळात आक्रमक भाषण, आंदोलनांमुळे ते कायम चर्चेत असतात. पहिल्यांदाच आमदार झालेल्या राम सातपुते हे आता लोकसभेच्या रिंगणात तीनदा आमदार असलेल्या प्रणिती शिंदेंचा मुकाबला करतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom