अबकी बार ४०० पारच्या नाऱ्यामुळे एनडीएचे नुकसान - छगन भुजबळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2024

अबकी बार ४०० पारच्या नाऱ्यामुळे एनडीएचे नुकसान - छगन भुजबळ



मुंबई - देशात गेले १० वर्षे भाजपा सत्तेत आहे. या सत्तेच्या काळात सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान सरकारने 'अबकी बार ४०० पार'चा (Abaki bar 400 par) नारा दिला. या नाऱ्यामुळे एनडीएचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दलितांच्या मनात ४०० जागा मिळाल्यास संविधान बदलणार हे बिंबवलं गेले. दलितांच्या मनातून संविधान बदलले जाणार नाही हे स्पष्ट करताना नाकीनऊ आले असे राज्याचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. (Marathi News) (Political News)

संविधान बदलणार याचा फटका -
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. यावेळी बोलताना, निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने ‘अब की बार 400 पार’चा नारा दिला होता. मात्र, या घोषणेमुळे भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं, अशी कबुली भुजबळ यांनी दिली आहे. ‘400 पार’च्या घोषणेमुळे दलित समाज मोठ्या प्रमाणात नाराज झाला, त्यामुळे एनडीएचे नुकसान झाले. एनडीए 400 पार गेल्यामुळे आपल्या देशाचं संविधान बदललं जाणार नाही ही गोष्ट लोकांना पटवून देताना आमच्या नाकीनऊ आले, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

मनुस्मृतीचा फटका बसणार -
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही. अबकी बार ४०० पार, संविधान बदलणार याच्या चर्चा कमी होत असतानाच आता शाळांमध्ये मनुस्मृती शिकवली जाणार अशी चर्चा सुरु झाली आहे, आगामी काळात याचा देखील फटका आपल्याला बसु शकतो याचा विचार आपण करायला हवा.असे ठाम मत भुजबळ यांनी मांडले आहे.

विधानसभेत 80-90 जागा हव्यात -
लोकसभा निवडणुकीत २०१९ ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपाने शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा. आम्हाला एवढ्या जागा हव्यात हे त्यांना सांगावे लागेल. जर ८०-९० जागा मिळाल्या तर ५०-६० निवडून येतील. आता ५० आहेत म्हणजे आम्ही ५० जागा घेऊ असे होणार नाही. आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून अशी मागणी भुजबळ यांनी केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad