महाविकास आघाडी २९ तर महायुती १७ जागांवर विजयी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 June 2024

महाविकास आघाडी २९ तर महायुती १७ जागांवर विजयी



मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत महविकास आघाडीचे २९, महायुतीचे १७ तर १ अपक्ष खासदार निवडून आला आहे. (Political News) (Lok Sabha Elections)

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात पाच टप्प्यात मतदान पार पडले होते. या मतदानाची मोजणी ४ जून रोजी शांततेत पार पडली. या निवडणुकीत राज्यात ठाकरे गटाने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक २१ जागा लढवल्या होत्या त्यापैकी ९ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसने १७ जागा लढवून १३ जागांवर विजय मिळवला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने १० जागा लढवल्या तर ८ जागांवर विजय मिळवला. महायुतीमध्ये भाजपाने सर्वाधिक २३ जागा लढवल्या तर ९ जागांवर विजय मिळवला. शिंदे गट १५ जागा लढवून ७ जागा जिंकला आणि अजित पवार गट ४ जागांवर निवडणूक लढला होता. त्यांना केवळ १ जागा जिंकता आली. सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad