नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2024

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला



नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कॅबिनेटच्या बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर केल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा मंजूर केला आहे. नवीन सरकार येईपर्यंत ते काळजीवाहू पंतप्रधान असतील. (Narendra Modi resigned from the post of pm) (Latest News)

लोकसभा निवडणुकीत एनडीएला ३९२ तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात पुन्हा एनडीएची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार बुधवारी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक झाली. बैठकीत लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. प्रस्तावाला कॅबिनेटने मंजूरी दिल्यानंतर हा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे सादर करण्यात आला. त्याला राष्ट्रपतींनीही मंजूरी दिली. राष्ट्रपतींनी राजीनामा मंजूर केल्यानंतर मोदींना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याची विनंती केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad