एसटी बसच्या धडकेत २ ठार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 July 2024

एसटी बसच्या धडकेत २ ठारपुणे - पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बस आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला असून त्यामध्ये, २ जण ठार झाले असून १५ हून अधिक प्रवासी जखमी आहेत. जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर ओतुरजवळ कार आणि एसटीबसचा भीषण अपघात झाला आहे. या घटनेत एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील प्रवाशांना चांगलाच हादरा बसला.

या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एसटी बसमधील १५ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिस व प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. अपघातातील जखमींना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात झालेली एसटी बस पारनेरवरुन मुंबईकडे तर, कार आळेफाट्याकडे जात असताना ओतुरजवळ हा अपघात झाला. बसमधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी आळेफाटा आणि ओतुर येथे दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad