
मुंबई - शिवसेना दक्षिण मुंबई शाखा क्र. २१४ च्या वतीने 'महिला सक्षमीकरणाचे तोरण, शिवसेनेचे धोरण' या उपक्रमांतर्गत ‘माझी लाडकी बहीण’ व ‘लेक लाडकी’ या योजनांसाठी नोंदणी उपक्रम राबवण्यात आला. शुक्रवार १९ जुलैपासून ते रविवार २१ जुलैपर्यंत ताडदेव येथील नव महाराष्ट्र नगर, वृंदावन बिल्डिंगजवळील जनसंपर्क कार्यालयात योजनेचे अर्ज भरले जातील. यावेळी, शिवसेना प्रवक्त्या ॲड. सुशीबेन शहा, शाखा प्रमुख संतोष सावंत, महिला शाखा प्रमुख स्वाती राणे, चंदा दराल आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment