मुंबई - बोरिवली येथील कनकिया समर्पण टॉवरला आज दुपारी आग लागली. या आगीत एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बोरिवली येथील कनकिया समर्पण ही इमारत २२ मजली असून आज गुरुवारी (२५ जुलै) दुपारी एकच्या सुमारास १ ते ६ मजल्यांच्या मीटर केबिनमध्ये आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. आगीच्या धुरामुळे चार जण गुदमरले, त्यांना श्र्वास घेण्याचा त्रास झाला. या चारही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी ७० वर्षीय महेंद्र शाह यांचा मृत्यू झाला. तर शोभा सावले (वय ७०), रंजना राजपूत (वय ५९) आणि शिवानी राजपूत (वय २६) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
No comments:
Post a Comment