मुंबई-आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलेंडर’ निवडणूक चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने एक पत्र जारी करून ही माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलेंडर, शिट्टी किंवा रोड रोलर यापैकी एक निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने वंचितला एक निवडणूक चिन्ह देण्याचे टाळले होते. परिणामी वंचितच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवर लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलेंडर’ निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
No comments:
Post a Comment