मुंबई - घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगरमधील शांतीसागर इमारतीला मध्यरात्री आग लागली. या आगीमुळे १३ जणांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांच्यापैकी ७ जणांनी डामा डिस्चार्ज घेतला असून ५ जणांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Fire in Ghatkopar Ramabai Nagar)
घाटकोपर पूर्व रमाबाई आंबेडकर नगरमध्ये शांतीसागर सोसायटी आहे. सात मजली इमारतीला रात्री दीडच्या सुमारास आग लागली. आगीत इमारतीची मीटर कॅबिन, इलेक्ट्रिक वायरिंग जळाली. आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर पसरला. धुरामुळे इमारतीमधील ८० ते ९० रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाने त्यांची सुटका केली. त्यामधील १३ जणांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाला. त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी ७ जणांनी उपचार घेवून डामा डिस्चार्ज घेतला. ५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर एकाला ओपीडीमध्ये उपचार करून घरी सोडण्यात आले.
No comments:
Post a Comment