Mumbai News - घाटकोपरमध्ये प्रेमी युगुलाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News - घाटकोपरमध्ये प्रेमी युगुलाची रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या

Share This

मुंबई - घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात एका प्रेमीयुगुलाने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेत आपल्या आयुष्याचा दुर्दैवी शेवट केला. आत्महत्या करणा-या मुलाचे वय १९ तर मुलीचे वय अवघे १५ वर्षे आहे. दोघांनी अशाप्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ वर्षीय मुलगा आणि १५ वर्षांची मुलगी, याचं एकमेकांवर प्रेम होते. दोघांनीही लग्न करून संसार थाटायचा होता. पण घरच्यांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. शिवाय मुलगीही अल्पवयीन होती. लग्नाला घरातून होणारा विरोध पाहता, दोघांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात एका एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages