दावोस बैठकीत सेक्स पार्ट्यामुळे जगभरात खळबळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दावोस बैठकीत सेक्स पार्ट्यामुळे जगभरात खळबळ

Share This

दावोस - वर्ल्ड इकोनॉमिक फोरमची पाच दिवसीय वार्षिक बैठक शुक्रवार २४ जानेवारी रोजी पार पडली. या बैठकीत सेक्स पार्ट्या, वेश्या आणि ट्रान्ससेक्सुअल महिलांची प्रचंड मागणी होती. उद्योगपतींच्या सेक्स पार्ट्यासंदर्भातील वृत्ताने संपूर्ण जगभरात खळबळ उडवून दिली आहे.

डेली मेल डॉट सीओ डॉट यूकेमध्ये प्रसिद्ध् झालेल्या एका वृत्तातून, दावोसमध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी आलेल्या जगभरातील दिग्गज गुंतवणूकदारांचे काळे सत्य समोर आले आहे. एस्कॉर्ट एजन्सिजने खुलासा केला आहे की, या बैठकीत सेक्स पार्ट्या, वेश्या आणि ट्रान्ससेक्सुअल महिलांची प्रचंड मागणी होती. सोमवारी सुरू झालेल्या या बैठकीसाठी जगभरातील ३,००० हून अधिक उद्योगपती आणि राजकीय नेते उपस्थित होते.

टिट4टॅटचे प्रवक्ते अँड्रियास बर्गर यांनी मेल ऑनलाइनला दिलेल्या माहितीनुसार, डब्ल्यूईएफच्या सुरुवातीपासूनच, आम्ही दावोस आणि जवळपासच्या प्रदेशात सुमारे ३०० महिला आणि ट्रान्स महिलांना बुक होताना बघितले आहे. याची तुलना २०२४ मध्ये बुक झालेल्या अंदाजे १७० महिलांशी केली जाऊ शकते.

या बैठकीत जागतिक उद्योजकांकडून २० लाख कोटी रुपयांपेक्षाही अधिकच्या गुंतवणुकीसाठी आश्वासन मिळवण्यास भारत यशस्वी झाला आहे. यांत ८० टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाच केंद्रीय मंत्री आणि तीन मुख्यमंत्र्यांसह या बैठकीचे भारताच्या वतीने नेतृत्व केले.

लिया मॉडेल्स एस्कॉर्ट एजन्सीच्या जान आणि लिया यांनी म्हटले आहे की, डब्ल्यूईएफसारख्या मोठ्या आयोजनात सर्वसामान्यपणे एस्कॉर्ट्सची मागणी वाढते. कारण जगभरातून अनेक उच्च-श्रेणीतील पाहुणे येत असतात. यामुळे डब्ल्यूईएफसाठी दावोसमध्ये एस्कॉर्ट्सचे येण्याचे मुख्य कारण पैसा कमावणे होते.

जगभरातील श्रीमंत लोक येत असतात. जे कोणत्या ना कोणत्या कंपनीचे मालक अथवा सीईओ असतात. काही महिला त्यांच्याकडून प्रति बुकिंग ६,००० डॉलर्स एवढे कमावतात. अनेक एजन्सीज हे मान्य करतात की, ही रक्कम श्रीमंत ग्राहकांसाठी काहीच नाही आणि त्यांचे क्लायंट महिलांच्या काही तासांच्या कंपनीसाठी एवढे पैसे सहज मोजतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages