Mumbai News १९ फेब्रुवारी रोजी प्राणिसंग्रहालय खुले राहणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

१८ फेब्रुवारी २०२५

Mumbai News १९ फेब्रुवारी रोजी प्राणिसंग्रहालय खुले राहणार



मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी सार्वजनिक सुटी आहे. असे असले तरी, दिनांक बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. तर दुसऱया दिवशी म्हणजे गुरुवार, दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी बंद असेल, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात येत आहे.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुटीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱया दिवशी बंद ठेवण्यात येते. या ठरावानुसार बुधवार, दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS