
मुंबई - महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना जेथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील प्राचीन महाबोधी महाविहार हे जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे.बौद्धांचे श्रद्धास्थान बौद्धांच्याच ताब्यात असले पाहिजे.महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देणे हा नैसर्गिक न्याय ठरेल. त्यामुळे 1949 चा महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा दुरुस्त करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन समितीत सर्व सदस्य बौद्ध असावेत असा कायदा करुन महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे असे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला देशभरात रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असून राज्यात रिपब्लिकन पक्ष लवकरच महाबोधी महाविहार मुक्तीसाठी मोठे आंदोलन पुकारणार आहे.अशी माहिती आठवले यांनी दिली. महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायद्यात बदल करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.बिहार सरकार आणि केंद्र सरकार शी बोलणार आहोत.महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळवून देण्याचा आपला निर्धार असल्याचे आठवले यांनी जाहीर केले. येत्या 2 मार्च रोजी नाशिक गोल्फ क्लब मैदान येथे बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली असून त्यात महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार असून या बौद्ध धम्म परिषदेस राज्यभरातून हजारो बौद्ध उपासक उपासिका उपस्थित राहतील अशी माहिती आठवले यांनी दिली.
Post Top Ad
01 March 2025
Home
देश-विदेश
महाराष्ट्र
मुंबई
बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या - रामदास आठवले
बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या - रामदास आठवले
Tags
# देश-विदेश
# महाराष्ट्र
# मुंबई
Share This
About JPN NEWS
मुंबई
Tags:
देश-विदेश,
महाराष्ट्र,
मुंबई
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment