
वाशिम (सागर शिंदे) - सामाजिक क्षेत्रात सक्रीय योगदान देणाऱ्या सिमताई राजेश सुरूशे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात अधिकृत प्रवेश केला. याच दिवशी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्छुभाऊ कडू यांच्या हस्ते त्यांना वाशिम जिल्ह्याच्या महिला जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
हा कार्यक्रम प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या संताजी-धनाजी पुरस्कार वितरण सोहळा आणि विभागीय मेळाव्यालाही विशेष प्रतिसाद मिळाला.
सिमताई सुरूशे यांनी महिलांचे सक्षमीकरण तसेच दिव्यांगांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक सेवेला आता पक्षाच्या अधिकृत मंचावरून बळ मिळणार आहे. या नियुक्तीमुळे वाशिम जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, विविध सामाजिक वर्तुळांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.
नियुक्तीनंतर सिमताई म्हणाल्या, "प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यातील महिलांसाठी तसेच दिव्यांग बांधवांसाठी काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. बच्छुभाऊ कडू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडीन."
No comments:
Post a Comment