आमदार अमीत साटम यांनी सफाई कामगारांसोबत केली दिवाळी साजरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 October 2025

आमदार अमीत साटम यांनी सफाई कामगारांसोबत केली दिवाळी साजरी


मुंबई - मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी आज कांदिवली पश्चिम येथील एकता नगर सफाई कामगार वसाहतीमध्ये सफाई कामगार बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी या कामगारांसोबत एकत्र बसून भोजन घेतले आणि त्यांच्या सेवेचा सन्मान केला.

कार्यक्रमादरम्यान सफाई कामगारांसाठी घरांच्या योजनांबाबतही चर्चा झाली. या विषयात भाई गिरकर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करत, त्या योजनेच्या कार्यान्वित करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले. 

यावेळी आमदार साटम यांनी मुंबई शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या सफाई कामगारांचे मनापासून आभार मानले. आमदार अमीत साटम यांनी 'आवाज मुंबईकरांचा, संकल्प भाजपचा' या अंतर्गत उपस्थित कामगारांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेतल्या तसेच शहराच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी त्यांच्या काही महत्वाच्या सूचना देखील नोंदवून घेतल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS