मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांच्या फेडरेशनचे अधिवेशन यशस्वी संपन्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

३१ ऑक्टोबर २०२५

मुंबई महापालिकेतील कामगार संघटनांच्या फेडरेशनचे अधिवेशन यशस्वी संपन्न


मुंबई (जेपीएन न्यूज) - मुंबई महानगरपालिकेतील सर्व कामगार व कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे शिखर संघटन असलेल्या मुंबई महापालिका कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनचे दोन दिवसीय अधिवेशन २८ व २९ ऑक्टोबर २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडले. या अधिवेशनात महापालिकेतील मोठ्या आणि लहान सर्व संघटनांचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दोन दिवस चाललेल्या या अधिवेशनात महापालिका कर्मचाऱ्यांच्या विविध महत्त्वाच्या मागण्या आणि प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. यात वैद्यकीय गट विमा योजना, बायोमेट्रिक हजेरी वेतनाशी जोडणे, अन्यायकारक वेतनकपात, अर्धवेतनी रजेचे चुकीचे परिगणन, सहाव्या वेतन आयोगानुसार होत असलेले निवृत्ती वेतन परिगणन, वेतन पुनर्रचना समिती असूनही काही कर्मचाऱ्यांना झालेला वेतनश्रेणीतील अन्याय, तसेच LSGD व LGS साठीची वेतनवाढ आणि रिक्त शेड्युल्ड पदे भरणे या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्यात आला. महापालिका कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघटनांचे एकत्रित व्यासपीठ अधिक मजबूत करण्याचा निर्धार या अधिवेशनातून व्यक्त करण्यात आला.

संघटनांच्या फेडरेशनच्या मजबूत बांधणीसाठीही या अधिवेशनात ठोस दिशा ठरविण्यात आली. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या सर्व प्रश्नांबाबत फेडरेशनकडून महापालिका आयुक्तांची भेट घेण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. अधिवेशनास प्रमुख नेते म्हणून बाबा कदम, अशोक जाधव, ॲड. प्रकाश देवदास, डॉ. संजय कांबळे (बापेरकर), रमाकांत बने, रमेश भुतेकर (देशमुख), यशवंत धुरी आणि दिवाकर दळवी यांच्या उपस्थितीने अधिवेशनाला दिशा मिळाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS