कूपर रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला, संध्याकाळपर्यंत ठोस कारवाईचा अल्टिमेटम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कूपर रुग्णालयातील डॉक्टरांवर हल्ला, संध्याकाळपर्यंत ठोस कारवाईचा अल्टिमेटम

Share This

मुंबई (जेपीएन न्यूज) - कूपर रुग्णालयात काल रात्री ड्युटीवरील डॉक्टरांवर रुग्णांच्या नातलगांनी केलेल्या हल्ल्याने वैद्यकीय क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत रुग्णालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्यास अपयश ठरल्याने रेसिडेंट डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर कूपर एमएआरडी (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स) ने आज सकाळी तातडीची बैठक घेऊन तीव्र निषेध नोंदवला. संस्थेने संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अतिरिक्त आयुक्त आणि रुग्णालय प्रशासनाशी बैठक घेऊन लिखित आश्वासन व ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

मार्डने स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर सुरक्षा व्यवस्थेबाबत ठोस कारवाई व लेखी हमी मिळाली नाही, तर सर्व गैर-आपत्कालीन सेवा बंद ठेवून सामूहिक रजा आंदोलन सुरू केले जाईल.”

डॉ. चिन्मय केळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “डॉक्टर भीतीच्या सावटाखाली काम करू शकत नाहीत. सुरक्षा ही तडजोडीची गोष्ट नाही.” “सुरक्षा यंत्रणा कोसळली तर रुग्णसेवा सुरळीत चालू ठेवणे शक्य नाही.”

घटनेनंतर रुग्णालय प्रशासन आणि मनपा अधिकाऱ्यांवर कठोर उपाययोजनांचा दबाव निर्माण झाला असून, संध्याकाळपर्यंतच्या बैठकीकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

प्रमुख मागण्या - 
1️⃣ आपत्कालीन व अतिदक्षता विभागात २४×७ प्रशिक्षित मार्शल/MSF दलाची नेमणूक
2️⃣ हल्लेखोरांवर Medicare Protection Act अंतर्गत तातडीने कारवाई
3️⃣ निष्काळजी सुरक्षा पर्यवेक्षकांचे निलंबन
4️⃣ कायमस्वरूपी सशस्त्र सुरक्षा व CCTV देखरेख
5️⃣ बहुपर्यायी सुरक्षा प्रणाली – सीमित प्रवेश, पॅनिक अलार्म, जलद प्रतिसाद पथक
6️⃣ दरमहा एमएआरडीच्या उपस्थितीत सुरक्षा लेखापरीक्षण

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages