घाटकोपर स्टेशनवरून कल्याण व कर्जत दिशेला लोकल सुरू करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घाटकोपर स्टेशनवरून कल्याण व कर्जत दिशेला लोकल सुरू करण्याची मागणी

Share This

मुंबई (जेपीएन न्यूज) - घाटकोपर पश्चिम विधानसभा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ग्राहक संरक्षण कक्षतर्फे घाटकोपर स्टेशन प्रबंधकांना स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वाचे निवेदन सादर करण्यात आले. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी घाटकोपरहून कल्याण व कर्जत दिशेला लोकल सेवा सुरू करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

शिवसेना नेते व ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच सचिव अशोक शेडे व निखिल सावंत यांच्या सुचनेनुसार आणि ईशान्य मुंबई विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवण्यात आली. घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या प्रयत्नातून हे निवेदन सादर करण्यात आले.

घाटकोपर स्टेशन प्रबंधक मधु कुमार यादव यांच्याशी या संदर्भात सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. प्रवासी संख्येत सतत वाढ होत असल्याने संध्याकाळच्या वेळेत घाटकोपर स्टेशनहून थेट कल्याण व कर्जत दिशेला लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आली. तसेच स्टेशनवर वाढत्या गर्दीचा भार कमी करण्यासाठी अधिक प्लॅटफॉर्मची गरज असल्याचेही नमूद करण्यात आले.

घाटकोपर हे मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाण असल्याने भविष्यात येथे “घाटकोपर जंक्शन” निर्माण व्हावे, याबाबतही निवेदनात चर्चा करण्यात आली. ही मागणी प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाला दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास कक्षाने व्यक्त केला.

या वेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी यशवंत खोपकर (विधानसभा संघटक), अनंत पवार (कक्ष प्रसारक), राजेंद्र पेडणेकर (उपसंघटक) आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages