प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढली, आता इतक्या प्रचारकांची यादी देता येणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढली, आता इतक्या प्रचारकांची यादी देता येणार

Share This

मुंबई (जेपीएन न्यूज) - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांकडून घोषित करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा राज्य निवडणूक आयोगाने २० वरून ४० इतकी दुप्पट केली आहे. या निर्णयामुळे मोठ्या पक्षांना प्रचाराचे नियोजन अधिक व्यापकपणे करण्यास मदत होणार आहे.

१४ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगात झालेल्या बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी ही मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

‘महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणी, विनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, २०२५’ मधील परिच्छेद २६ मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तरतुदी नमूद आहेत. त्याच आधारे आयोगाने सुधारणा करत नवीन मर्यादा लागू केली आहे.

राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी त्यांच्या ४० प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages