मुंबई महापालिकेचा ‘रस्ते दत्तक उपक्रम’ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई महापालिकेचा ‘रस्ते दत्तक उपक्रम’

Share This

मुंबई - मुंबईतील रस्त्यांची स्वच्छता आणि देखभाल अधिक प्रभावीपणे करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘रस्ते दत्तक उपक्रम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत शहर आणि उपनगरातील ७३० हून अधिक रस्ते व मार्गांची जबाबदारी २४६ कनिष्ठ पर्यवेक्षकांना देण्यात येणार आहे. प्रत्येक पर्यवेक्षक किमान तीन प्रमुख रस्त्यांचे दत्तकत्व स्वीकारणार आहे.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीत हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत —
* रस्त्यांवरील टाकाऊ पदार्थ, बांधकाम राडारोडा आणि कचरा नियमितपणे हटवला जाईल

* पदपथ, सेवा रस्ते, दुभाजक आणि मध्यवर्ती भागांची नियमित स्वच्छता व धुलाई केली जाईल

* धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी मिस्टिंग मशीनद्वारे फवारणी केली जाईल

* उड्डाणपुलाखालील व चौकातील भित्तीचित्रांची स्वच्छता केली जाईल

डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, “सार्वजनिक ठिकाणांची दीर्घकालीन देखभाल आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांचाही सहभाग यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे.”

नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवून पालिकेच्या स्वच्छतेच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages