मुंबईत चार ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत चार ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शहरात चार नवीन ठिकाणी कबुतरांना ‘नियंत्रितरित्या दाणे टाकण्यास (controlled feeding)’ परवानगी दिली आहे. या ठिकाणी फक्त सकाळी ७ ते ९ या वेळेतच दाणे टाकण्याची मुभा असेल. मात्र, सध्या बंद असलेले विद्यमान कबुतरखाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

महानगरपालिकेने जाहीर केलेल्या चार नव्या ठिकाणांमध्ये —
1️⃣ वरळी जलाशय परिसर (वरळी रिझर्व्हायर)
2️⃣ अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला बॅक रोडजवळील खारफुटी परिसर
3️⃣ मुलुंड (पूर्व) येथील जुना ऐरोली-मुलुंड जकात नाका परिसर
4️⃣ गोराई मैदान, बोरिवली (पश्चिम)
या ठिकाणीच कबुतरांना दाणे टाकण्यास मर्यादित परवानगी असेल.

महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कबुतरखान्यांचे व्यवस्थापन स्वयंसेवी संस्थांकडे सोपवले जाणार आहे. संस्थांना स्वच्छता, वाहतूक अडथळा टाळणे, नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. त्यासाठी संबंधित संस्थेकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. या व्यवस्थेवर तज्ज्ञ समितीचा अहवाल आणि माननीय उच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत ही अंतरिम व्यवस्था म्हणून लागू करण्यात आली आहे.

दरम्यान, कबुतरखान्यांबाबत नागरिकांकडून ९,७७९ हरकती, सूचना आणि तक्रारी महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कबुतरखाने बंद करावेत, सुरु ठेवावेत किंवा स्वच्छतेची काळजी घ्यावी अशा विविध मागण्या आहेत.

महानगरपालिकेने स्पष्ट केले की, न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यमान कबुतरखाने बंद राहतील आणि फक्त या चार नव्या ठिकाणीच ‘नियंत्रित feeding’ पद्धतीने दाणे टाकण्यास मुभा असेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages