केईएम मार्डच्या शताब्दी विशेषांकासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची विशेष मुलाखत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केईएम मार्डच्या शताब्दी विशेषांकासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची विशेष मुलाखत

Share This

मुंबई - केईएम रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (KEM MARD) तर्फे प्रकाशित होणाऱ्या RESCRIPTA – One Hundred Years, Infinite Stories या शताब्दी विशेषांकासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार, नामवंत अभिनेते आणि केईएमचे माजी विद्यार्थी (एमबीबीएस) डॉ. अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली.

या संवादात डॉ. कोल्हे यांनी केईएममधील आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणींना उजाळा देत, वैद्यकीय शिक्षणातील अनुभव आणि रेसिडेंट डॉक्टरांच्या संघर्षांविषयी मनमोकळेपणाने भाष्य केले. केवळ आजारांवर उपचार करण्याऐवजी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवर उपचार करण्याची गरज असून, पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ बळकट करण्याची जबाबदारी शासन व धोरणकर्त्यांची असल्यावर त्यांनी भर दिला.

रेसिडेंट डॉक्टरांच्या सलग ड्युटी, कामाच्या तासांमुळे येणारा ताण आणि मानवीय कामकाजाच्या अटी या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. रेसिडेंट डॉक्टरांच्या हक्कांसाठी केईएम मार्डने सातत्याने केलेल्या लढ्याचा उल्लेख करत, धोरणात्मक पातळीवर रेसिडेंट डॉक्टरांचे जीवनमान सुधारण्यासाठी कोणते “प्रिस्क्रिप्शन” आवश्यक आहे, यावरही डॉ. कोल्हे यांनी आपले स्पष्ट मत मांडले.

यावेळी केईएम मार्डतर्फे डॉ. अमोल कोल्हे यांना त्यांच्या नव्या मालिकेसाठी ‘मी सावित्रीबाई जोतिराव फुले’ या यशस्वी वाटचालीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी कथा मांडण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या मुलाखतीस केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. अमर अगमे आणि सरचिटणीस डॉ. शुभम वाघमारे उपस्थित होते. रेस्क्रिप्टा या शताब्दी विशेषांकातील ही मुलाखत केईएमच्या वैद्यकीय, सामाजिक आणि सार्वजनिक सेवेतील समृद्ध वारशाला अधोरेखित करणारी एक महत्त्वपूर्ण भर ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages