
मुंबई महापालिका मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी ६४,३७५ अधिकारी-कर्मचारी, ४,५०० स्वयंसेवक आणि २२ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार असून निवडणुकीच्या रिंगणात १,७०० उमेदवार आहेत.
महापालिकेने मतदान केंद्रांवर आवश्यक सर्व यंत्रणा व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ८० हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यापैकी सध्या ६४ हजार कर्मचारी प्रत्यक्ष तैनात आहेत. मतदानाच्या दिवशी स्वयंसेवक मतदार रांगा लावणे, गर्दी व्यवस्थापन, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना मदत करण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.
प्रत्येक प्रभागात किमान एक ‘गुलाबी सखी’ मतदान केंद्र असणार असून या केंद्रांवर पोलीस व निवडणूक कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी महिला असतील. मतदान केंद्रावर मतदारांनी शक्यतो मोबाईल फोन घेऊन जाऊ नये, अन्यथा तो स्विच ऑफ ठेवावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मतदानात सहभागी होऊन लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मतदान केंद्रांवरील सुविधा
मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, प्रतीक्षागृह, शेड, स्वच्छतागृहे, पुरेशी प्रकाश व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्प व व्हिलचेअर, तसेच आवश्यक दिशादर्शक फलक उपलब्ध असतील. दिव्यांग मतदार, गर्भवती महिला व ज्येष्ठ नागरिकांना मतदान कक्षात प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.
मतदानासाठी भरपगारी सुट्टी
राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उद्योग, आस्थापना आणि कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले आहे. सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची सशुल्क सवलत देणे आवश्यक असून आदेशांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
आचारसंहिता पथक सक्रिय
प्रत्येक प्रशासकीय विभागात विभागीय सहायक आयुक्तांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता पथके कार्यरत असून रोख रक्कम, दारू व शस्त्रसाठ्याच्या बेकायदेशीर वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
प्रत्येक प्रशासकीय विभागात विभागीय सहायक आयुक्तांच्या अधिपत्याखाली आचारसंहिता पथके कार्यरत असून रोख रक्कम, दारू व शस्त्रसाठ्याच्या बेकायदेशीर वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
निवडणुकीची महत्त्वाची आकडेवारी
कंट्रोल युनिट: २०,०००
बॅलेट युनिट: २५,०००
मतदान केंद्रे: १०,२३१
केंद्र ठिकाणे: २,२७८
उमेदवार: १,७०० (पुरुष ८२२, महिला ८७८)
एकूण मतदार: १,०३,४४,३१५
पुरुष: ५५,१६,७०७
महिला: ४८,२६,५०९
इतर: १,०९९
कंट्रोल युनिट: २०,०००
बॅलेट युनिट: २५,०००
मतदान केंद्रे: १०,२३१
केंद्र ठिकाणे: २,२७८
उमेदवार: १,७०० (पुरुष ८२२, महिला ८७८)
एकूण मतदार: १,०३,४४,३१५
पुरुष: ५५,१६,७०७
महिला: ४८,२६,५०९
इतर: १,०९९

No comments:
Post a Comment