१ मार्चपासून बेस्ट बस मार्गांमध्ये बदल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 February 2026

१ मार्चपासून बेस्ट बस मार्गांमध्ये बदल


मुंबई - बेस्ट (BEST) प्रशासनाने १ मार्च २०२६ पासून काही बस मार्गांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा लक्षात घेऊन हे संक्षिप्तीकरण व विस्तार करण्यात येत असल्याचे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.

वातानुकूलित बस सेवेत बदल - 
A-103, A-204, A-235, A-248, A-245, A-369, A-492 या वातानुकूलित बस मार्गांमध्येही बदल जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये आर.सी. चर्च, अंधेरी स्थानक (पूर्व), मरोशी मार्ग, माहुल गाव, मझगाव आगार आदी ठिकाणांदरम्यान धावणाऱ्या बसमार्गांचा समावेश आहे.

BEST प्रशासनाच्या या निर्णयामुळे काही प्रवाशांना बदललेल्या अंतिम थांब्यांमुळे पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे, तर काही भागांमध्ये प्रवास अधिक सुलभ होणार आहे. प्रवाशांनी १ मार्चपासून लागू होणाऱ्या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन BEST प्रशासनाने केले आहे.

काही बसमार्गांचे अंतिम थांबे बदलण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे - 
मार्ग क्र. ५-९ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सांताक्रूझ दरम्यान धावणारी बस आता वांद्रे रेल्वे स्थानक येथेच समाप्त होईल.

मार्ग क्र. ६६ – बँके आगार ते टाटा पॉवर केंद्र दरम्यानचा मार्ग डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक येथे समाप्त करण्यात येणार आहे.

मार्ग क्र. १२२ – विजयनगर चौक ते मझगाव आगार हा मार्ग आता जिजामाता उद्यान येथे समाप्त होईल.

मार्ग क्र. ६६-ड – प्रभादेवी ते वरळी आगार मार्गात बदल करण्यात आला आहे.

मार्ग क्र. ९९ – जागतिक व्यापार केंद्र ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गाचा काही भाग कमी करण्यात आला आहे.

मार्ग क्र. ४११ – वरळी आगार ते संघर्ष नगर (चांदिवली) मार्ग संत कवीर (६० फूट मार्ग) येथे समाप्त होईल.

मार्ग क्र. ए-४१५ – आगारकर चौक (अंधेरी पूर्व) ते सीप्झ मार्गातही बदल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS