जैसलमेर मध्ये होणार भारतीय संस्कृती आणि समरसतेचा महाकुंभ, सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जैसलमेर मध्ये होणार भारतीय संस्कृती आणि समरसतेचा महाकुंभ, सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती

Share This

मुंबई - स्वर्णनगरी जैसलमेर येथे जैन समाजाचा भव्य आध्यात्मिक युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादर​ महामहोत्सव​ आयोजित करण्यात येत असून या महोत्सवात भारतीय संस्कृती आणि समरसता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवतजी यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ मार्च रोजी या महोत्सवाचा शुभारंभ होणार​ असून ८ मार्च पर्यंत श्रद्धा, तप व त्यागपरंपरे​चा उत्सव सुरु राहणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान भवनात दिली. हा अध्यामिक महोत्सव सामाजिक बंधुभाव आणि आस्थेचं प्रतीक ​असल्याचे प्रतिपादनही मंत्री लोढा यांनी यावेळी केले.  
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवतजी यांच्या व्याख्यानाने समरसता कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. येत्या ६ मार्च पासून सुरू होणारा हा महोत्सव ८ मार्च पर्यंत चालणार असून यात सुमारे एक लाख भाविक सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर समरसता कार्यक्रमाच्या अनुषंगाने देशभरातून विविध धर्म आणि पंथांचे २५०० साधू , संत आणि महंत वसुधैव कुटुम्बकम् यावर वैचारिक मंथन करणार आहेत.  

खरतरगच्छाधिपती पूज्य श्री जिनमणिप्रभ सुरिश्वरजी यांच्या पावन ​सानिध्यात ८७१ वर्षानंतर युगप्रधान प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या दिव्य चादर​चे दर्शन या चादर महोत्सवाच्या माध्यमाने या पिढीला होणार आहे. जैन श्वेतांबर समुदायाचे प्रथम दादा गुरुदेव श्री जिनदत्तसूरी यांच्या ​८७​१ वर्षांपूर्वीच्या अग्निसंस्कारावेळी त्यांचे शरीर भस्म झाले; मात्र त्यां​चे पवित्र वस्त्र ​चादर, चोल-पट्टा व मुखपट्टी अक्षत राहिली. या अद्भुत व पवित्र चादरीच्या पूजनासाठीच चादर महोत्सव साजरा केला जातो. खरतरगच्छ समुदायासाठी हा महोत्सव अत्यंत आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्वाचा मानला जातो.​ 
 संपूर्ण देशात  या आयोजनाबाबत मोठा उत्साहअसून तयारी अंतिम टप्प्यात आहे.  

महोत्सवादरम्यान दादा गुरुदेवांशी संबंधित पवित्र चादर, चोल-पट्टा व अन्य ऐतिहासिक वास्तूंचे विशेष पूजन, आराधना, प्रवचन, भक्ती कार्यक्रम, ऐतिहासिक ५ किलोमीटरची शोभायात्रा तसेच सामूहिक धार्मिक विधी आयोजित करण्यात येणार आहेत. हा महोत्सव आध्यात्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून समाजात धर्म, संयम, अहिंसा आणि सदाचाराचा संदेश प्रसारित करणारा आहे, असेही मंत्री लोढा म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages