
मुंबई - महापौर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या महापौर रितू राजेश तावडे यांनी आज (१२ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीत मुंबई महानगरपालिकेच्या विविध विकासकामांबाबत तसेच आगामी प्रकल्पांच्या अंमलबजावणीसंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती मिळाली. मुंबईतील पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था आणि नागरिकाभिमुख उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्य शासनाचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही महापौरांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून आवश्यक ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाजपा गटनेते गणेश खणकर उपस्थित होते.

No comments:
Post a Comment