विक्रोळी पार्कसाईट येथील रहिवाशांना 7 दिवसांत PAP सदनिकांत स्थलांतराचे आदेश - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विक्रोळी पार्कसाईट येथील रहिवाशांना 7 दिवसांत PAP सदनिकांत स्थलांतराचे आदेश

Share This

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागामार्फत विक्रोळी पार्कसाईट परिसरातील अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर व सहाय्यक आयुक्त ‘एन’ विभाग यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.

सदर इमारतीतील महानगरपालिका भाडेकरू रहिवाशांना पुनर्वसन योजनेअंतर्गत (PAP) पर्यायी सदनिका देण्यात आल्या असून, त्या सदनिकांचा पत्ता भांडुप गावातील CTS क्र. 291/1 ते 291/4 (नवीन CTS क्र. 291/B/1, 291/B/2, 291/B/3 व 291/B/4), एल.बी.एस. रोड, ‘एस’ वॉर्ड येथे (मे. ओबेरॉय रिॲलिटी लिमिटेड) असा आहे.

मात्र, अद्यापपर्यंत संबंधित भाडेकरूंनी सदनिकांचा ताबा घेतलेला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांनी पुढील ७ दिवसांच्या आत स्वतःहून PAP सदनिकांत स्थलांतर करावे, अन्यथा पोलिसांच्या मदतीने सदनिका रिक्त करून मुंबई महानगरपालिका अधिनियम 105 बी अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सूचनेत देण्यात आला आहे.

याबाबत सर्व संबंधित भाडेकरूंनी तातडीने नोंद घ्यावी, असे आवाहन मालमत्ता अधिकारी ‘एन’ विभाग व सहाय्यक आयुक्त ‘एन’ विभाग यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages