महापालिका प्रशासनाच्या चार वर्षांच्या कामांची श्वेतपत्रिका काढा, किशोरी पेडणेकर यांचे महापौरांना पत्र - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2026

महापालिका प्रशासनाच्या चार वर्षांच्या कामांची श्वेतपत्रिका काढा, किशोरी पेडणेकर यांचे महापौरांना पत्र


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून मागील चार वर्षांत करण्यात आलेल्या विकासकामांची सविस्तर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी किशोर पेडणेकर यांनी महापौर रितू राजेश तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

७ मार्च २०२२ पासून महापालिका प्रशासक राजवट लागू झाल्यानंतर ते फेब्रुवारी २०२६ पर्यंतच्या कालावधीत कोणती विकासकामे करण्यात आली, किती निधी खर्च करण्यात आला, तसेच स्थायी समिती आणि सुधार समितीमार्फत किती प्रस्ताव मंजूर झाले, याची तपशीलवार माहिती नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

प्रशासकीय कालावधीत हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आल्याचा उल्लेख करत, या खर्चाचे पारदर्शक लेखाजोखा सादर करावा, जेणेकरून मुंबईकरांना प्रशासनाच्या कामाचा संपूर्ण आढावा घेता येईल, असेही पेडणेकर यांनी नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS