पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गर्भवतीला चुकीचे रक्त दिले; प्रकृती गंभीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2026

पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात गर्भवतीला चुकीचे रक्त दिले; प्रकृती गंभीर


मुंबई - गोवंडी (पूर्व) येथील मुंबई महापालिकेच्या Shatabdi Hospital येथे नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला चुकीचा रक्तगट दिल्याचा आरोप समोर आला आहे. महिलेचा रक्तगट O+ve असताना तिला B+ve रक्त चढविण्यात आल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. यामुळे महिलेची प्रकृती बिघडल्याने चौकशीची मागणी होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शनाया शाहीद शरीफ शेख ही 25 वर्षीय महिला गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. आज शुक्रवारी दुपारी सुमारे ४ वाजता तिला रक्तपुरवठा करण्यात आला. सुमारे १ तासानंतर महिलेला अंगावर शहारे येणे आणि दोन वेळा उलटी होणे अशी लक्षणे दिसली. त्यानंतर रक्तपुरवठा तातडीने थांबवण्यात आला. 

संबंधित महिलेची रक्तपुरवठा करताना प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी चौकशी केली असता ओ पॉझिटिव्ह ऐवजी बी पॉझिटिव्ह रक्त देण्यात आल्याचे समोर आले. सदर महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालय (Lokmanya Tilak Municipal General Hospital) येथे हलवण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात रक्त पुरवठा करताना मोठी चूक झाल्याने महिलेची प्रकृती गंभीर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेची चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून याबाबत अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS